Thursday, April 19, 2007

दोन नंबरी नागपूर?

गेल्या काही महिन्यांपासून मी नागपूर परिसरात प्लॉट विकत घेण्याचा प्रयत्नं करते आहे. बहुतेक लोकांच्या असतात तशा माझ्याही अटी आहेत - मोक्याच्या जागी, मला परवडेल अशी वगैरे वगैरे. पण त्याखेरीज माझी एक जास्तीची अट आहे. ती म्हणजे मला सगळा व्यवहार नंबर एक मधे करायचा आहे. माझ्या अमेरिकन नवर्‍याला हे सांगितले तेव्हा त्याला नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे काय ते आधी समजवून सांगावे लागले. भारतातले लोक (म्हणजे इतकी समृद्ध परंपरा असलेले)असं काही करतात यावर त्याचा विश्वास बसेना. (हा! हा! हा!) असो.
नागपूरातल्या एजंट लोकांनी मला एकतर मूर्खात काढले आहे किंवा सहानुभूती दाखवून माझ्याशी व्यवहार करण्यात असमर्थता दाखवली आहे. एका एजंटने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी जामिन विकताना ७०-९० टक्के रक्कम नंबर दोनमधे घेत आहेत. प्रॉपर्टी डेव्हलपर्स फार तर ५०% नंबर एक मधे घेत आहेत. हे सगळं सरकारी आशिर्वादानी आणि संगनमतानी होत आहे काय?
माझी नंबर एकची अट पूर्ण करू शकणारा कोणी एजंट तुम्हाला माहित आहे काय?

Labels: , , ,